राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकाचे हात कापून निर्घृण खून

RSS Worker Has Hand Chopped Off,

वेबटीम : तिरुअनंतपुरम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक राजेश एडावाकोडे याचे हात कापून निर्घृण खून करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात राजेशचा मृत्यू झाला आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून संघाच्या स्वयंसेवकांवर तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांवर केरळमध्ये हल्ले होत आहेत . यापूर्वी देखील कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात स्वयंसेवकांना जीव गमवावा लागला आहे. कालचा धक्कादायक प्रकार राजधानी तिरुअनंतपुरम येथे शनिवारी रात्री 9 वाजता घडला.राजेशवर हल्ला करून त्याच्या हाताचे पंजे कापून वेगळे करण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्याला केआयएमएस रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अतीरक्तस्रावामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलिस अधिकारी मनोज अब्राहम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसह एका टोळीने शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा हल्ला केला. हल्ला करणाऱ्या टोळीचे आणि पीडित राजेश यांचे पूर्ववैमनस्य होते. तरीही या घटनेत राजकीय कट आहे का? किंवा कुठल्या नेत्याचा हात आहे का? या दिशेने सुद्धा तपास केला जात आहे.

या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच कथित माकप कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रादेशिक कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही माकप प्रदेश सरचिटणीस कोडियेरी बालकृष्ण यांच्या मुलाच्या घरावर हल्ला केला.संतप्त भारतीय जनता पक्षाने रविवारी केरळात राज्यवारी बंद पाळला आहे.