‘आरएसएसच्या कार्यक्रमांत पुरुषच दिसतात, 50% महिलांचा समावेश करावा लागेल’

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरएसएसमध्ये महिलांचा समावेश करण्याबाबत भाष्य केलं आहे.  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट हिंदू समाजाला एकजूट करण्याचे आहे. यासाठी संघाच्या कार्यक्रमात कमीत कमी ५०% महिलांना सहभागी करावे लागेल, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते उत्तराखंडातील हलद्वानीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोणतीही संघटना पूर्णपणे केवळ पुरुषांची होऊ शकत नाही. परंतु आम्ही जेव्हा कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा त्यात केवळ पुरुष दिसतात. जेव्हा की देशात ५० टक्के लोकसंख्या महिलांचीही आहे. प्रत्येक कामात संपूर्ण कुटुंब सहभागी असते. तसेच महिलासुद्धा संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन समाजाच्या उत्थानात योगदान देऊ शकतात. भागवत म्हणाले, ‘जे हिंदू लग्नासाठी धर्म बदलत आहेत, ते मोठी चूक करत आहेत. कसे धर्मांतर होत आहे? मुले-मुली दुसऱ्या धर्मात कसे जात आहेत. छोट्या स्वार्थासाठी, लग्नासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहे. आम्ही आपल्या मुलांना घडवत नाही का? एक वेळ सिंगापूरला नक्की जा, मात्र आपल्या काशीला जाणे विसरू नका. पिझ्झा खा, पण हजारो वर्षांपासून सिद्ध पारंपरिक भोजन सोडू नका.’

मूल जन्मल्यानंतर कमीत कमी तीन वर्षांतच त्याच्यात मूळ गुणांचा विकास होतो. तो कुटुंबाकडूनच सर्व शिकतो. त्यामुळे व्यग्रता कितीही असो, आठवड्यातून एक दिवस कुटुंबासाठी द्या. त्या दिवशी पूर्ण कुटुंबाने भजन-कीर्तन करावे. सामूहिक भोजन करावे. गप्पा माराव्यात. घरचेच जेवण खावे, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या