राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हिंदू दहशतवादासाठी जबाबदार- दिग्विजय सिंह

भोपाळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हिंदू दहशतवादासाठी जबाबदार आहे. आतापर्यंत जेवढे हिंदू दहशतादी पकडले ते संघाचे स्वयंसेवकच होते, मी नेहमी ‘हिंदू आतंकवाद’ नाही तर ‘संघी आतंकवाद’ म्हटले आहे. असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील झांबुआ इथं दिग्विजय सिंह बोलत होते. त्याआधी काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही हिंदू दहशतवादी शब्द वापरला होता. पण टीकेची झोड उठवल्यानं त्यांनी घुमजाव केला. आता पुन्हा एकदा 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुढे आला आहे.

You might also like
Comments
Loading...