रजनीकांतच्या मदतीने तामिळनाडूत भाजपला सत्ता !

टीम महाराष्ट्र देशा: अभिनय क्षेत्रातील ‘कबाली’ रजनीकांतने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून राज्यातील समीकरणे बदलणार असल्याच दिसत आहे.  केंद्र आणि जवळपास २० राज्यातील सत्ता हस्तगत केल्यानंतर आता भाजपला तामिळनाडूचे वेध लागले आहेत. मात्र, अद्यापही भाजपला तिथे पाय रोवता आलेले नाहीत. त्यामुळे आता रजनीकांच्या मदतीने भाजपला सत्ता मिळवण्यात यश येईल असा विश्वास संघाचे विचारक गुरूमुर्ती यांनी व्यक्त केला आहे.
तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत, त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आणि पंतप्रधान मोदींच्या  प्रशासकीय कुशलतेच्या जोरावर भाजपचा विजय होवू शकतो असे भाकीत गुरूमुर्ती यांनी वर्तवले आहे.
You might also like
Comments
Loading...