प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक राहुल गांधींचा घणाघाती आरोप

टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तर मोदी सरकार आरएसएसच चालवत असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केला आहे. चार दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्याचा शेवटचा दिवस होता. कर्नाटक येथील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी आज बिजनेस लीडर्स आणि प्रोफेशनल्ससोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संघ आणि भाजपा सरकारवर टिका केली.

निती आयोगामध्येही आरएसएसचे लोक आहेत. भाजपाचा भारतातील प्रत्येक इंस्टीट्यूशन कॅप्चर करण्याचा प्रयत्न आहे. भारताची विदेश नितीही त्यामुळंच खराब होत आहे. चीन आपल्या शेजारील सर्व देशांवर आपला धाक जमवून बसला आहे आणि भारत एकटाच पडला आहे. अशी टीका सुद्धा राहुल गांधी यांनी यावेळी केली.

You might also like
Comments
Loading...