आरएसएस आंदोलन करणारी नाही तर मनुष्य निर्मितीचे कार्य करणारी संघटना आहे

mohan bhagavat on raygad

टीम महाराष्ट्र देशा : आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या प्रलंबित खटल्यावर निकाल दिला आहे. हा निकाल पूर्णपणे रामलल्लाच्या बाजूने लागला आहे. तर मुस्लीमांना ही अयोध्यात 5 एकर स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेतून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत या निर्णयाला जय पराजय असे न समजता कोर्टाने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित खटल्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत. यावेळी त्यांनी भूतकाळ विसरून पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Loading...

त्यानंतर भूतकाळ विसरून पुन्हा एकत्र येत आनंद व्यक्त करू असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आंदोलन करणारी संघटना नसून मनुष्य निर्मितीचे कार्य करणारी संघटना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्यांना मस्जिद कोणत्या ठिकाणी उभारण्यात यावी, असे विचारले असता हा निर्णय सर्वस्वी कोर्टाचा असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?