देशात दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं – मोहन भागवत

टीम महाराष्ट्र देशा : सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असे प्रतिपादनही भागवत यांनी केले.

ते उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये संघाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, ‘लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघा राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल,’ असे मोहन भागवत म्हणाले.

Loading...

तसेच CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरही चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतप्रदर्शन केले. याबाबत बोलताना भागवत म्हणाले, ‘सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असे ते म्हणाले.

दरम्यान, मोहन भागवत यांनी याआधी डिसेंबर महिन्यात देशातली 130 कोटी जनता हिंदूच आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच वाद ओढवला होता. आता त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे असल्याचे असं वक्तव्य केले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण