fbpx

भीमा-कोरेगाव घटनेचे लोकसभेतही पडसाद ; काँग्रेस आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला दगडफेक झाली होती याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पाळण्यात येत आहेत. एकीकडे या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना आता लोकसभेत सुद्धा या घटनेचे पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. आज लोकसभेत या प्रकरणावरून चांगलीच आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं

काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी भीमा – कोरेगाव हिंसेमागे हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिथ-तिथ दलितांवर अन्याय होतो असा गंभीर आरोप सुद्धा खर्गे यांनी केला. तर मल्लिकार्जून खर्गे यांनी नरेंद्र मोदी ‘मौनी बाबा’ असल्याचा टोलाही लगावला.

यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसवर ही दंगल पेटवण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याबरोबर शांतता राखण्यासाठी आमचं सरकार पुरेपूर प्रयत्न करत असल्याची माहिती देखील दिली.