आरएसएस आणि गडकरीच रचत आहेत मोदींच्या हत्येचा कट – शेहला रशीद

nitin-gadkari

नवी दिल्ली:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोदींच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप ‘जेएनयू’तील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केलाय.शेहला रशीद यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले होते की, संघ आणि गडकरी मोदींच्या हत्येचा कट आखत असल्याचे दिसतेय. मोदींची हत्या करून मुस्लीम किंवा कम्युनिस्टांवर बालंट आणायचे. त्यानंतर जमावाकडून मुस्लिमांच्या कत्तली करत सुटायचे, असा संघ आणि गडकरींचा डाव असल्याचे रशीद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

दरम्यान गडकरी यांनी शेहला रशीद यांच्या या ट्विटची गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर, मात्र रशीद यांनी युटर्न घेतला आहे. मी हे विधान केवळ उपहासाने केले होते, अशा आशयाचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला केवळ एका उपहासात्मक ट्विटमुळे इतका राग येतो. मग विचार करा, प्रसारमाध्यांना हाताशी धरून उमर खालिदसारख्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात मोहीम चालवण्यात आली, तेव्हा त्यांचे काय झाले असेल, असे शेहला रशीद यांनी म्हंटले.