कोरेगाव-भीमा दंगलीत 9.45 कोटीचं नुकसान

तर 'महाराष्ट्र बंद'च्या वेळी सुमारे १३ कोटींचं नुकसान

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत 9.45 कोटीचं नुकसान झाले असून महाराष्ट्र बंदच्या वेळी सुमारे 13 कोटींचं नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  तसेच ‘महाराष्ट्र बंद’ प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा विधिमंडळात केली. मात्र गंभीर खटल्यांच्या बाबतीत समिती निर्णय घेईल असे ते म्हणाले.

या प्रकरणी आतापर्यंत 162 आरोपींना अटक करण्यात आलीय. संभाजी भिडे यांच्यावर बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी टाळले. मात्र मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, फरार झाल्यावर कोंबिंग ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संभाजी महाराजांची समाधी राज्य सरकार ताब्यात घेणार असून, त्याची सगळी व्यवस्था राज्य सरकार पाहणार आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.