पुण्यात तरुणाची ७५ हजार रुपयांची फसवणूक

atm

पुणे : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाची ७५ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादी प्रकाश लोढा यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, ते जगताप चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी माझ्या एटीएममधून पैसे निघत नाहीत, तुमच्या एटीएममधून पैसे निघतात का बघु असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचे एटीएमकार्ड घेऊन ते परस्पर बदली करून त्याचा पिन नंबर विचारुन घेतला. यानंतर त्याच्या खात्यातून ७५ हजार ९०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक(गुन्हे) यु.ए.तावसकर तपास करत आहेत.