राज्यात ७१५ कोटी रूपये जलसंधारणाच्या कामावर खर्च झाले, कृषीमंत्र्यांची माहिती

टीम महाराष्ट्र देशा- ‘मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगा’साठी ३५ प्रस्तावांना शासनानं मंजूरी दिली आहे. तसंच शेती अवजारावरचा जीएसटी माफ करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे. ते आज कोल्हापूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते.

सध्या जमिनीचा पोत कायम टिकवण्याचं तसंच रासायनिक खतं, किटकनाशकं आणि पिकांवर पडणारे रोग ही मोठी आव्हानं असून राज्यात ७१५ कोटी रूपये जलसंधारणाच्या कामावर खर्च झाल्याची माहितीही बोंडे यांनी यावेळी दिली.