AirTel- २४४ रूपयांत ७० जीबी डेटा

भारतीय एयरटेल कंपनीने आता आपल्या युजर्ससाठी प्रति दिवसाला एक जीबी अशा तब्बल ७० दिवसांपर्यंत ७० जीबी डाटा आणि मोफत अमर्याद कॉलिंगची सुविधा २४४ रूपयांमध्ये सादर केली आहे.

 

देशात आता उत्तमोत्तम इंटरनेट पॅकेजेस सादर करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ कंपनीने अलीकडेच ३०९ रूपयांचा पॅक सादर केला होता. यात ८४ दिवसांपर्यंत प्रत्येक दिवसाला एक जीबी डाटा आणि मोफत अमर्याद कॉलिंगची सुविधा देण्यात आले होते.

 

भारती एयरटेल कंपनीने ७० दिवसांची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन सादर केला आहे. यात प्रत्येक दिवसाला एक जीबी डेटा मोफत मिळेल. यासोबत संबंधीत युजर हा देशभरात अमर्याद मोफत कॉल करू शकेल. यासोबत एयरटेलने ४९९ रूपयात नवीन प्लॅन जाहीर केला असून यात याच कालखंडासाठी दिवसाला सव्वा जीबी डाटा देण्यात येणार आहे. रिलायन्सच्या ३०९ / ५०९ रूपयांच्या प्लॅनला टक्कर देण्याचा एयरटेलचा प्रयत्न आहे.