गुरुद्वारा बोर्डास कर्जस्वरुपात दिलेले 61 कोटी रुपयांचा निधी माफ-मुख्यमंत्री

devendra-fadnavis

नांदेड : गुरु गोविंद सिंगाचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपल्या समाजाचे गुलामीपासून व संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण परिवाराचे बलिदान करुन एक लढवय्या पंथाची स्थापना केली. त्यामुळे गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. नांदेड येथील गुरुद्वाऱ्यामध्ये श्री गुरु गोविंद सिंग यांच्या 350 व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नांदेड येथील गुरुद्वारात येवून गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतल्यानंतर नवीन ऊर्जा मिळते. गुरु गोविंद सिंग यांनी या पंथास बलिदानाची विशेष परंपरा प्राप्त करुन दिली असून त्यांनी स्वाभिमानी समाजाची निर्मिती केली. भक्ती व शक्तीच्या रुपाने गुरु गोविद सिंग यांनी भारताला नवीन मार्ग दाखविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने गुरुत्तागद्दीच्या वेळेस गुरुद्वारा बोर्डास कर्जस्वरुपात दिलेले 61 कोटी रुपयांचा निधी माफ करण्यात येईल. तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या निवासाकरिताच्या भूखंडावर असलेले आरक्षण रद्द करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

Loading...

गुरु गोविंद सिंग यांचा जयंती दिन म्हणजे 22 डिसेंबर रोजी राज्यात राज्य शासनामार्फत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगून गुरुद्वारा परिसरातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याची कारवाई लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. त्यावेळी पंचप्यारे साहिबांच्यावतीने गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंगजी यांनी श्री. फडणवीस यांचा पारंपरिक पध्दतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा बोर्डामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव विशेषांकाचे विमोचन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.Loading…


Loading…

Loading...