उद्योजकाला ५६ लाखांचा गंडा; मुख्‍य आरोपीला १३ दिवसानंतर न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डिलरशीप देण्याचे फेक जाहिरातीव्दारे आमिष दाखवून उद्योजकाला ५६ लाखांना गंडविल्याप्रकरणी मुख्‍य आरोपी नितीश कुमार जितेंद्र प्रसाद सिंग (२४, रा. हतीयारी बिमनवान काशी चौक नालंदा बिहार) याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सोमवारी दि.१४ दिले.

वाळुज औद्योगिक वसाहतीत चांगदेव सोमीनाथ तांदळे (४९, रा. सिडको वाळुज महानगर-१, प्लॉट क्र. १०, सिडको कार्यालयाजवळ) यांची रविकिरण इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. शहरातील एका दैनिकात १ आॅगस्ट २०१९ रोजी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या  गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशीत झाली होती.

या जाहिरातीव्दारे भामट्यांनी तांदळे यांना सुमारे ५६ लाख ६४ हजार ७०० रुपयांना गंडा घातला. प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नितीशकुमार याला पोलिसांनी आरोपीला २ जून रोजी झारखंड येथून अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP