भाजपाकडून स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च- अशोक चव्हाण

शेगाव (बुलडाणा): काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भाजपाने स्थापना दिनानिमित्त घेतलेल्या महामेळाव्यावर टीका केली आहे. राज्यातला शेतकरी होरपळत असताना, मुंबईत भाजपा स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे कोणते लोकाभिमुख सरकार आहे, अशे फटकारे अशोक चव्हाण यांनी सरकारवर ओढले.

भाजपा सत्तेवर आल्यापासून जातिवादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे राज्यात अराजकता माजत आहे, तर कोरेगाव भिमासारख्या प्रकरणालाही खतपाणी घालण्याचे काम भाजपाकडून करण्यात येत आहे. असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आ