‘प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये वसूली, कर्मचारी उपाशी नेते तुपाशी’

‘प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये वसूली, कर्मचारी उपाशी नेते तुपाशी’

जितेंद्र आव्हाड

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. या संपाबाबत बुधवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. यात पगारवाढीसह अन्य मागण्या मान्य केल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले, मात्र अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी एसटी कर्मचारी आंदोलनाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत (MLC Sadakhau Khot) आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर आरोप केले आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ३५० रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून असे ७० हजार कर्मचारी. कर्मचाऱ्यांची लूट, ST संप, कर्मचारी उपाशी नेते तुपाशी, असे ट्विट करत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाना साधला आहे.

आंदोलन शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. ही पगारवाढ नोव्हेंबरपासून देऊ असंही सरकारने म्हटलं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.

महत्वाच्या बातम्या