ग्राहकांच्या हितास्तव ३५ रू. प्रतिकिलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय – सुभाष देशमुख

मुंबई  :राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तूरडाळीचा दर ५५ रू प्रतिकिलो ऐवजी ग्राहकांच्या हितास्तव ३५ रू. प्रति किलो निश्चित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले. श्री. देशमुख म्हणाले, या निर्णयाने या हंगामात खरेदी केलेली व पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल. थेट ग्राहकांना लाभ होण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ५५ रू प्रती किलो ऐवजी ३५ रु प्रती किलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय महत्त्वाचा आहे.

शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थाना पूर्णत: अथवा अंशत: अनुदानित संस्थाद्वारे तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यत फक्त राज्य पणन महासंघाकडूनच शासकीय दराने करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

You might also like
Comments
Loading...