रत्नागिरी येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार

The Union Minister for Petroleum & Natural Gas and Skill Development & Entrepreneurship, Shri Dharmendra Pradhan and the UAE Minister of Foreign Affairs & International Cooperation, His Highness Sheikh Abdul

नवी दिल्ली  : रत्नागिरी येथील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

रत्नागिरी जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री तथा एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या .

Loading...

अशी असणार भागीदारी
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागिदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे.

उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन

पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे असे होणार फायदे
या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर (क्रूड ऑईल) प्रक्रिया करण्यात येईल. तसेच, पेट्रोल , डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनेही या प्रकल्पातून करण्यात येणार आहेत. या सोबतच मोठ-मोठया प्रकल्पांसाठी कच्चा मालही या प्रकल्पातून पुरविण्यात येणार आहे.

यापूर्वी ११ एप्रिल २०१८ रोजी १६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रीस्तरीय शिखर संमेलनात सौदी अरामकोने भारतासोबत आरआरपीसीएल प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला असून आज एडनॉक समूहाला सहगुंतवणूकदार केले आहे.

गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील अडचणीत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'