चक्क कारच्या टायरमधून जप्त केली २.३ कोटींची रोकड ; आयकर विभागाचा छापा

टीम महाराष्ट्र देशा : आयकर अधिकाऱ्यांनी घेतलेल्या झडतीमध्ये चक्क कार च्या टायरमध्ये लपवलेली २.३० कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड बेंगळुरू ते शिवमोग्गा येथे आणण्यात आली होती.

Loading...

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. आणि निवडणुका म्हटलं की  पैसा हा आलाचं. आयकर विभागाने संपूर्ण निवडणुकीच्या हंगामात हातभार लावला आहे. आयकर विभागाने देशभरात अनेक ठिकाणी छापे मारून रोकड जप्त केली आहे.

कर्नाटक राजधानीतून शिवमोग्गा येथे पैसे पाठवल्याबद्दल आयकर विभागाला माहिती मिळाली होती, त्यानुसार अधिकार्यांनी कार शोधून तिची झडती घेतली आणि चक्क कारच्या स्पेअर टायरमध्ये त्यांना तब्बल २.३० कोटींची रोकड सापडली.

सध्या याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल आहे. पैसा लपवण्यासाठी काय शक्कल लढवतील याचा नेम नाही अशीच प्रतिक्रिया सर्वत्र पाहायला मिळत आहे.Loading…


Loading…

Loading...