fbpx

Budget 2019; दिवसाला १७ रु. ही तर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

टीम महारष्ट्र देशा : लोकसभेमध्ये आज भाजप सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून किसान , जवान , मध्यम वर्गीय माणूस, यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. तसेच या अर्थसंकल्पाचे सगळ्या सामाजिक स्तरातून स्वागत केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासा म्हणून ज्या तरतुदींची अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली, त्यावर गांधी यांनी सडकून टीका केली. शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. यावर वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दिवसाला अवघे १७ रुपये शेतकऱ्याला देणे म्हणजे त्याची क्रूर थट्टा असल्याची टीका राहुल यांनी मोदी सरकारवर केली.

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. या अर्थसंकल्पातून देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच आहे. अस मत फडणवीस यांनी मांडले आहे.