मुंबई पुन्हा तुंबली : पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

शेलार

मुंबई – मुंबईतील मोठ्या नाल्यांतील १०४ टक्के गाळ उपसला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या नाल्यांमधून पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र पहिल्याच पावसात या दाव्याची पोलखोल झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.

याशिवाय कामावर निघालेल्या नोकरदारांना वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे काही तासातच सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

या पार्श्वभूमीवर आता विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.भाजप आमदार आशिष शेलार यांनी पालिकेवर याच मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय. नालेसफाई कधी 107%..कधी 104%… दाव्यांचे आकडे. मोठे-मोठ्याने ‘वाझे’पहिल्या पावसातच ‘कटकमिशन’चे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा!! असे शेलार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP