Shree Tulja Bhavani- श्री तुळजा भवानीच्या दर्शनासाठी लागणार १०० रुपये शुल्क

उस्मानाबाद- जिल्ह्यातल्या श्री तुळजा भवानी मंदिरात आजपासून दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत सशुल्क दर्शन सुरु करण्यात आलं आहे. बारा वर्षावरील व्यक्तिसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याची माहिती तहसीलदार एस.व्ही.पवार यांनी दिली. दरम्यान, याआधीची अति महत्वाच्या व्यक्तिंसाठीची दर्शन प्रथा बंद करण्यात आली आहे. तुळजा भवानी देवीच्या पुजेच्या वेळेतही बदल करण्यात आला असल्याची माहिती पवार यांनी दिली.

दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात अति महत्वाच्या व्यक्ती- व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. अशा दर्शनासाठी प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली. याशिवाय अभिषेक आणि सिंहासन पुजेतच्या दरातही वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा- Subsidy Scam Osmanabad- अनुदान घोटाळाप्रकरणी २८ जणांना फरार.
           माजी नगराध्यक्ष, तत्कालीन नगरसेवक तसंच अधिकाऱ्यांचा समावेश