fbpx

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

balasaheb

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकासाठी 100 कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लवकरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक उभे राहणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या म्हणजे 23 जानेवारीला जयंती आहे. जयंतीचे औचित्य साधून उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच शिवसेनेच्या प्रमुख्य नेत्यांच्या उपस्थितीत गणेश पुजनानं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.तसेच उद्याच महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच हे भव्य स्मारक महापौर बंगला परिसरात उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्यासाठी 10 जानेवारी रोजी मुंबई महापालिका आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाला. महापौर बंगल्याच्या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारले जाणार आहे.

1 Comment

Click here to post a comment