काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहील – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : संपूर्ण देश आज ७१ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ७ वाजून २८ मिनीटांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. काळा पैसा आणि भ्रष्टाोधातील आमचा लढा सुरूच राहील, आम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले, अशा महान व्यक्तिमत्वांचाही पंतप्रधान मोदी यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. भारत ही महात्मा गांधी आणि बुद्धांची भूमी आहे, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे ही देशाची परंपरा आहे. नोटाबंदीनंतर १ लाख ७५ हजार बनावट कंपन्यांची नोंदणी रद्द झाली. याशिवाय करदात्यांची संख्यादेखील वाढली. काळा पैसा उघड झाल्याने सुमारे ३ लाख कोटी रुपये व्यवहारात परत आले असून बँकेत पैसे जमा झाल्याने व्याज दरात कपात झाली आहे, असेही ते म्हणाले. नोटाबंदीनंतर देशातील 3 लाख कंपन्यांचे हवाला रॅकेट उद्ध्वस्त झाले असून आतापर्यंत पावणे दोनलाख कंपन्यांवर सरकारने बंदी आणली आहे. माझ्या देशातील शेतक-यांमध्ये मातीतून सोने पिकवण्याची धमक आहे. शेतीसाठी आम्ही ९९ योजना आणल्या. त्यापैकी २१ योजना सुरु झाल्या आहेत. तर ५० योजना लवकरच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले. देश प्रगतीपथावर आहे. देशातील अंतर्गत सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याचेही ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयकामुळे व्यापार क्षेत्र मजबूत झाले असून तरुणांना नोक-या मिळतील, तेव्हाच देशाची प्रगती होईल,असेही ते म्हणा यांनी आपल्या भाषणाची सांगता ‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा देत केली.