fbpx

गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आर आर पाटील समर्थकात संतापाची लाट

टीम महाराष्ट्र देशा : वंचित आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टिका केली होती. तेव्हा संजय पाटील यांच्या प्रेमात पडलेल्या पडळकर यांनी आर आर पाटील यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते.

या निवडणुकीत मात्र पडळकर आर आर पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचा वापर करत मते मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत.याचाच भाग म्हणून ‘सुमनताई माझी बहिण आहे.’अस विधान ते करतात. काल तर पडळकर यांच्या समर्थकांनी आर आर पाटील यांच्या सुपूत्राचा रोहित पाटील यांचा तीन महिन्यांपुर्वीचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

एका कार्यक्रमाला रोहित पाटील हे ‘मी गोपीचंद यांना दादा म्हणतो.’अस विधान केले होते.नेमका तोच भाग व्हायरल करून आर आर आबा यांच्या समर्थकांचा पडळकर यांना पाठिंबा असल्याचे भासवले जात आहे. या प्रकारामुळे आर आर पाटील यांच्या गटात संतापाची लाट उसळली आहे. रोहित पाटील अजून राजकारणात सक्रिय नाहीत ते शिक्षण घेतात.विध्यार्थी असलेल्या रोहित यांच्या व्हिडीओचा केवळ मतासाठी गैरवापर केल्याने आबा समर्थकात गोपीचंद पडळकर यांच्याबदल संताप व्यक्त होतोय.

आर आर पाटील यांच्या हयातीत गोपीचंद पडळकर त्यांच्यावर जहरी टिका करत. आबांचे विरोधक संजय पाटील यांच्या बाजूने असताना त्यानी आबांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता.राजकारणात टिका केली जाते,पण पडळकर यांची टिका खालच्या भाषेत असायची. आबांनी मात्र कधीही पडळकर यांच्या टिकेला उत्तर दिले नव्हते. आबा त्यांची दखलही घेत नव्हते.

संजय पाटील यांच्याशी बिनसल्यावर मात्र पडळकर यांना आबा ग्रेट होते याचा कसा साक्षात्कार झाला. ते, सुमनताई माझी बहिण आहे तिला त्रास झाला तर माझ्याशी गाठ आहे’ असे मोठ्या आवाजात सांगू लागले.ते ज्या घटनेचा भांडवल करून सुमनताई पाटील यांना साथ देणार अस म्हणतात. ती घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी पडळकर यांनी त्या घटनेचा निषेध का केला नाही. संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सुमन पाटील यांना कोंडून घातले तेव्हा पडळकर का धावून आले नाही किंवा संजय पाटील यांचा निषेध केला नाही?असा सवाल उपस्थित होत आहे.

संजय पाटील यांच्याशी बिनसल्यावरच त्यानी ‘सुमनताई माझी बहिण’अस बोलायला सुरुवात केली.त्या अगोदर मात्र पडळकर यांनी सुमनताई पाटील यांची विचारपूस का केली नाही?आर आर पाटील आजारी असताना पडळकर त्याना भेटायला दवाखान्यात का गेले नाहीत?अशाही प्रश्न विचारला जात आहे.