आरपीआयला हव्यात एवढ्या जागा, आठवलेंनी करून दिली आठवण

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. या माध्यमातून राजकीय नेते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. त्यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या जागावाटपात मित्रपक्षांना किती जागा सोडण्यात येतील याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. युतीचा घटकपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या आरपीआयला १० जागा हव्या आहेत अशी आठवण भाजप आणि शिवसेनेला करून दिली.

पिंपरी चिंचवड येथे बोलताना रामदास आठवले यांनी आम्हाला मिळणाऱ्या दहा जागांपैकी पुण्यातील कॅन्टोन्मेंट आणि पिंपरी या दोन जागांचा समावेश असल्याचंही आठवले यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना आरपीआयला या दोन जागा सोडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, पुढे बोलताना आठवले यांनी शरद पवार यांनी सर्वच घटकांसाठी मोठे काम केले आहे पण देशभरात मोदींची हवा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्या पक्षात विजयाची खात्री नसल्यामुळे ते पक्ष सोडत असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.

आम्ही कॉंग्रेसला सत्तेवर येऊनचं देणार नाही : रामदास आठवले

राष्ट्रवादीतले अनेक नेते दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात – महाजन

बाजारबुणग्यांचे ठरायच्या अगोदर माझं ठरलंय अन हनीमुन पण झालाय – जयकुमार गोरे