पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा 

rpi

मुंबई  – महाराष्ट्रात येत्या दि. 1 डिसेंबर रोजी होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप च्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

तीन पदवीधर मतदारसंघ आणि एका शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढत असलेल्या भाजप च्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन देखील रामदास आठवले यांनी केले आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजप चे उमेदवार शिरीष बोराळकर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजप चे उमेदवार संग्राम देशमुख, नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघातील भाजप चे संदीप जोशी,अमरावती शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. नितीन धांडे,या सर्व भाजप उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या