वंचित आघाडी म्हणजे किंचित आघाडी, रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

blank

टीम महाराष्ट्र देशा : आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वंचित आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. मी सर्व आघाड्या करून मग इकडे आलो आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होणार नाही हे मला माहित आहे अस आठवले म्हणाले.

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही. याउलट तिसऱ्या आघाडीचा फायदा आम्हालाच होईल असा विश्वासदेखील आठवले यांनी व्यक्त केला. तसेच, प्रकाश आंबेडकर यांनी आतून मदत करण्यापेक्षा डायरेक्ट भाजपला मदत करावी. इकडे आले तर त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळू शकते त्यामुळे आंबेडकर यांनी भाजपसोबत यावे असे आवाहन देखील त्यांनी आंबेडकरांना केले.

तसेच, दलित समाज भाजपसोबत आहे. त्यामुळे यावेळी एनडीएचे सरकार पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.