fbpx

आता काश्मीरमध्ये ५०० ‘सुपर वूमन्स’ रोखणार दगडफेक

श्रीनगर : काश्मीरमधील दगडफेकीला प्रतिबंध घालण्यासाठी 500 विशेष महिला कमांडो तयार केल्या जाणार आहेत. यासाठी श्रीनगरमध्ये एक ट्रेनिंग कँप चालवला जात आहे.काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या हिंसाचारात अनेकवेळा महिला दगडफेक करताना दिसून आल्या आहेत. यामुळे भारतीय जवानांना त्यांचा मुकाबला करणे कठीण जाते. म्हणून आता सरकारने हा नवीन उपाय शोधलाय.

सुपर 500 मध्ये या महिलांना दगडफेकीवर नियंत्रण करण्यासाठी तीन स्तरावर प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यात आधी स्वसुरक्षेचेही धडे दिले जातील. एका महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांना सैन्यात समाविष्ट केले जाईल. येणाऱ्या काही दिवसात सुपर 500 ला सेनेच्या इतर ऑपरेशनमध्येही समाविष्ट करण्याची योजना आहे. त्यांना कोंबिंग, एन्काउंटर आणि रेस्क्यू ऑपरेशन सारखी महत्वपूर्ण प्रशिक्षणेही देण्यात येणार आहेत.

मागील बऱ्याच वर्षांपासून भारतीय सुरक्षाबळांवर मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचे आरोप लागत आले आहेत. म्हणून आता सेनेने यावर उपाय म्हणून सुमारे 500 ‘सुपर वूमन्सची तुकडी तयार केली आहे.

आता ‘हे’ अधिकारी ‘अल कायदा’च्या हिटलिस्टवर

3 Comments

Click here to post a comment