आरपीएफने २०१६ मध्ये ११ लाख चोर पकडले; महाराष्ट्र प्रथम स्थानी

मुंबई : २०१६ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने एकूण ११ लाख चोरांना अटक केली आहे. यात महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे. महाराष्ट्रातून २०१६ मध्ये एकूण २.२३ लाख चोरांना पकडण्यात आले आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशातून १.२२ लाख चोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरपीएफने मध्यप्रदेशातून ९८ हजार, तामिळनाडूतून ८१ हजार ४०८ आणि गुजरातमधून ७७ हजार ४७ चोरांना ताब्यात घेतले आहे.यामध्ये रेल्वेतील बोल्ट, टॉवेल, कांबळ, वॉश बेसिन, फिश प्लेट्स, ट्यूबलाइट, पंखे व तांब्याच्या तारा चोरणा-यांचा समावेश आहे.रेल्वेतील चांगल्या दर्जाचे तार आणि तांबे चोरण्यावर या चोरांचा सर्वाधिक भर असायचा. तसेच काही जण ट्रॅकचे पार्टस चोरून बाजारात विकत असायचे. एक मीटर ट्रॅकचा तुकडा ६० किलोचा असतो, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.