पुणे : कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे ज्येष्ठ सुपुत्र पृथ्वीराज महाडिक यांचा रविवारी (दि. २१ फेब्रुवारी) रोजी शाही पद्धतीने विवाह संपन्न झाला. एकीकडे कोरोना वेगाने वाढत असताना जनसामन्यांच्या कार्यक्रमांवर कडक निर्बंध आले असताना परवानगी पेक्षा जास्त लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्समध्ये पार पडललेल्या या विवाह सोहळ्यास तुफान गर्दी झाली होती.
मास्कसह, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांना हरताळ फासले गेल्याचे समोर आले आहे. यावरून लॉन्स चालकाला नोटीस बजावण्यात आली असून पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. तर, महाडिक कुटुंबीय वा वधूच्या कुटुंबियांवर यांच्यावरील कारवाईचा अद्याप खुलासा झालेला नाही. या सोहळ्याची चौकशी होणार असून पृथ्वीराज यांचा विवाह वैष्णवी देशमुख यांच्याशी झाला आहे. भाजप व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास केलेल्या महाडिकांचा राजकीय क्षेत्रातील मित्र परिवार देखील मोठा आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजेश टोपेंचे पत्राद्वारे जनतेला कळकळीचे आवाहन; म्हणाले…
- ‘अमिताभ, अक्षय यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण रोखून दाखवाच – गिरीश महाजन
- ‘यही है अच्छे दिन?’, इंधन दरवाढीवरून मुंबईत युवा सेनेची मोदीं विरोधात पोस्टरबाजी
- फाशी दिली जाणाऱ्या शबनमने साधला मुलाशी हृदय पिळवटून टाकणारा संवाद
- इंधनदरवाढीला विरोध करत रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून गाठले ऑफीस