अकरा रंगांसह Royal Enfield Classic 350 बुलेट भारतात लाँच; जाणून घ्या अधिक

Royal Enfield Classic 350

मुंबई : मागील काही वर्षापासून रॉयल एनफील्ड बुलेटची क्रेझ तरुण वर्गात प्रचंड पाहायला मिळाली. रॉयल एनफील्ड ही कंपनी भारतात एक लोकप्रिय बनली आहे. भारतीय ग्राहक या कंपनीच्या बाईक्सची आतुरतेने वाट पाहात असतात.

अनेक बुलेटप्रेमी रॉयल एनफील्ड क्लासिक 350 च्या मॅाडेलची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता बुलेटप्रेमीची ही प्रतीक्षा संपली आहे. काल ही बाईक काल भारतात 11 रंगासह लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत 1.86-1.92 लाख रूपये आहे.

या बाईकमध्ये क्रोम रेड, क्रोम ब्रॉन्झ, डार्क स्टील्थ ब्लॅक, हॅल्सियन ग्रीन, हॅल्सियन ब्लॅक, हॅल्सियन ग्रे, रेडडिच सेज ग्रीन, डेजर्ट सँड, रेडडिच रेड, डार्क गनमेटल ग्रे आणि मार्श ग्रे कलर्समध्ये उपलब्ध आहे.

जाणून घ्या खास वैशिष्ट्ये – 

रॉयल एनफील्ड ने क्लासिक 350 सोबत पहिल्यासारखेच 349 cc सिंगल-सिलेंडर डीओएचसी इंजिन दिले आहे. जे 6,100 आरपीएवर 20.2 बीएचपी पर्यंत आणि 4,000 आरपीएमवर 27 एनएम पीक टॉर्क बनवतो. कंपनीने या इंजिनसोबत 5 स्पीड गियरबॉक्स दिला आहे.

बुलेट सिंगल आणि डबल सीट ऑप्सन्स या बुलेटसाठी उपलब्ध असणार आहेत. या मॅाडेलची रचना ही सध्याच्या मॉडेल सारखीच असेल. यामध्ये क्रोम बेझल्ससह रेट्रो-स्टाईल सर्क्युलर हेडलँप, क्रोम-प्लेटेड एग्जॉस्ट, राउंड-शेप्ड रियर-व्यू मिरर, एक टियरड्रॉप शेप्ड फ्यूल टँक यांचा समावेश आहे. त्यासोबतच नवे टेल-लँप आणि इंडिकेटर्स तसेच उत्तम कशनिंग सीट्स मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या