नरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ !

सुरात : सुरतमधील हजीरा येथे लार्सन अँड टूब्रो (एलअँडटी)तोफेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रणगाड्यावर स्वार झाके आहेत. त्या व्हिडिओची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे, लोकाभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळेच मोदी तोफेवर स्वार झाल्याचे बोलले जात आहे.

 

सुरत येथील हजीरा येथे लार्सन अँड टूब्रो (एलअँडटी) यांनी होवित्झर या तोफेची निर्मिती केली आहे. या तोफेच्या उद्घाटनप्रसंगी मोदींना तोफेवर स्वार होण्याचा मोह आवरता आला नाही.

पंतप्रधानांनी स्वतः याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, विरोधकांना एक प्रकारे इशाराच देण्यात आला आहे. या तोफांच्या निर्मितीसाठी सुरतपासून 30 किमी अंतरावर हजीरा येथे प्रकल्प सुरु करण्यात आला आहे