Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या

Rose Health Benefits | टीम कृषीनामा: गुलाबाला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या फुलाच्या मदतीने लोक आपले प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहित आहे का? गुलाब प्रेमासाठी जसे फायदेशीर आहे त्याचबरोबर गुलाबाचे आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात. गुलाबामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, सोडियम, कॅल्शियम, आयरन, फायबर, कार्बोहायड्रेट इत्यादी घटक माफक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे गुलाबाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. गुलाबाचे पुढील आरोग्यदायी फायदे आहेत.

मुळव्याधासाठी फायदेशीर (Beneficial for piles-Rose Health Benefits)

तुम्ही जर मुळव्याधाचे रुग्ण असाल तर गुलाबाच्या पाकळ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. गुलाबाच्या पाकळ्याच्या मदतीने पचनक्रिया सुधारून आतड्यांची संबंधित हालचाल वाढू शकते. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे फायबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

तणाव कमी होतो (Reduces stress-Rose Health Benefits)

गुलाबाच्या पाकळ्या मनाला शांत करून तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्याने तणाव कमी होऊन मन शांत होऊ शकते. तुम्हाला जर थकवा किंवा चिंतेमुळे झोप येत नसेल तर तुम्ही बेडवर गुलाबाची फुले ठेवून झोपू शकतात. गुलाबाच्या सुगंधाने थकवा आणि चिंता दूर होण्यास मदत होते.

वजन कमी होते (Weight loss-Rose Health Benefits)

गुलाबाच्या पाकळ्यामध्ये आढळणारे घटक वजन कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये दहा ते पंधरा गुलाबाच्या पाकळ्या उकळून घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये चिमूटभर दालचिनी आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. नियमित या पियाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for skin-Rose Health Benefits)

गुलाबामध्ये अंटीबॅक्टरियल आणि फायटोकेमिकल्स गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर गुलाबाच्या मदतीने त्वचेवरील डाग दूर होते आणि त्वचेचा टोन सुधारण्यास देखील मदत होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाबाचा वापर करू शकतात.

गुलाबाचे आपल्या आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

व्यवस्थित झोप घ्या (Get proper sleep-For Mental Health)

मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी व्यवस्थित झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज आठ तास झोप घेणे अनिवार्य आहे. व्यवस्थित झोप झाल्यावर तुम्ही दिवसभर ताजे आणि सकारात्मक राहू शकतात.

मेडिटेशन करा (Do meditation-For Mental Health)

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज ध्यान आणि योगासने करणे खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज मेडिटेशन केल्याने मन शांत आणि सकारात्मक राहते. त्याचबरोबर नियमित ध्यान केल्याने शारीरिक आरोग्य देखील चांगले राहू शकते.

पोषक आहाराचे सेवन करा (Consume nutritious food-For Mental Health)

नैराश्य, तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोषक आहाराचे सेवन केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतात. निरोगी आहाराचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादींचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Curd And Sugar | दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर

Hormonal Control | हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टीचा समावेश

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करायची असेल तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Exit mobile version