छतावरील सौरऊर्जा प्रकल्पधारक वीजग्राहकांच्या अडचणी सोडविणार

MSEDCL light meter

पुणे : रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पांच्या वीजग्राहकांच्या नेटमीटरचे रिंडींग, बिलींग संदर्भात असलेल्या अडचणी लवकरच सोडविण्यात येतील. तसेच नेटमीटर व बिलिंग सुरु करण्याची प्रशासकीय कार्यवाही आणखी वेगवान करण्यात येईल. अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी दिली.

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पधारक वीजग्राहकांसाठी विशेष ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयात पुणे परिमंडल अंतर्गत शनिवारी (दि. 4) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या 33 नेटमीटर वीजग्राहक व प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्य अभियंता श्री. तालेवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री उत्क्रांत धायगुडे (प्रादेशिक कार्यालय, पुणे), सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगलपल्लेवार आदींची उपस्थिती होती.

सुमारे अडीच तासांच्या उपक्रमात प्रामुख्याने बिलिंगबाबतच्या तक्रारी अधिक असल्याचे दिसून आले. यावेळी महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान आणि वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बिलिंग संदर्भात असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत लघु व उच्चदाब वर्गवारीतील 1402 नेटमीटरधारक वीजग्राहक आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महावितरणकडून हा विशेष ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे तक्रार दिनाच्या उपक्रमाचे आयोजन पुढील दोन महिन्यात करण्यात येईल.

आम्ही भाष्य करायला सुद्धा घाबरतो – मधुर भांडारकर