VIDEO- शिवसृष्टी प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे दीपक मानकरांची २०१३ मधील भूमिका

वेब टीम – चांदणी चौकातील बीडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. त्यासाठी निधीपण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुण्यातील शिवसृष्टी ऐतिहासिक व्हावी यासाठी मनपाने शिवसृष्टीला मदत करावी. बीडीपीच्या (जैवविविधता उद्यान) जागेबाबत किती जागा हवी, टीडीआर किती? याचा निर्णय सर्वाना सोबत घेऊन त्वरित घ्या. जगभरातील पर्यटक शिवसृष्टी पाहण्यासाठी येणार असल्याने मेट्रोनेही शिवसृष्टी ते रामवाडी असे स्टेशन निर्माण करावे. शिवाय बीडीपीच्या आजूबाजूला झोपडपट्टी निर्माण होणार नाही, याची दक्षताही मनपाने घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे वनाज- रामवाडी मेट्रोचे काम वेगात होणार आहे. कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेत मेट्रोचा डेपो होणार हे स्पष्ट झाले आहे. 11 फेब्रुवारीपासून होणारे आंदोलन मागे घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर यांनी सांगितले आहे.

पुण्यातील शिवसृष्टीचा तिढा सुटला पण श्रेयवादाच्या लढाईला सुरवात झालीये. पहा तत्कालीन काँग्रेसचे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले आणि या शिवसृष्टी प्रकल्पासाठी सुरवातीपासून पाठपुरावा करणारे दीपक मानकर यांची २०१३ मधील भूमिका.

पुण्यात भाजपचा जल्लोष…शिवश्रुष्टी चा तिढा सुटला….श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात.