हरियाणातही बाळासाहेबांचा दरारा ; नेत्याने दिला ठाकरे स्टाईल आंदोलनाचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची क्रेझ हरियाणाच्या नेत्यांमध्येही पाहायला मिळाली. जननायक पार्टीचे नेते दुष्यत चौटाला यांनी ठाकरे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दुष्यत चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे नातू आहेत.

Loading...

महाराष्ट्रा प्रमाणेच हरियाणातही तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दुष्यत चौटाला यांनी हरियाणातील तरूणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दुष्यत चौटाला यांनी हरियाणातील तरूणांना रोजगार द्या नाहीतर गरज पडल्यास मी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मार्गाने आंदोलन करेन असे म्हंटले आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तरूणांच्या रोजगाराच्या मुद्यावरून अनेक आंदोलन केले आहेत. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या आंदोलनाची एक वेगळीच स्टाईल आहे. आता ही स्टाईल हरियाणातही वापरली जाणार असल्याचे दिसत आहे.Loading…


Loading…

Loading...