रोहित वेमुला दलित नव्हता

नैराश्येतून आत्महत्या केल्याचा चौकशी समितीने काढला निष्कर्ष

रोहित प्रकरणावरून मोदी सरकार दलितांच्या विरोधात असल्याचे आरोप करण्यात आले होते मात्र रोहित वेमुला दलित नव्हता तसेच विद्यापीठाने केलेल्या कारवाईमुळे त्याने आत्महत्या केली नाही, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.

केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींना एका पत्र लिहून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ हे जातीयवादी, उग्रवादी आणि राष्ट्रविरोधी राजकारणाचा अड्डा झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या पत्रानंतरच विद्यापीठ प्रशासनाने पाच विद्यार्थ्यांची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली. यापैकी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने जानेवारी 2016 मध्ये आत्महत्या केली होती.

रोहितप्रकरणावरून संपूर्ण देशभरात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट उठली होती, मोदी सरकार दलितांच्या विरोधात असल्याचे आरोपही करण्यात आले होते. तसंच हैदराबाद विद्यापीठातील आंदोलनाचे लोण दिल्लीतही पोहोचलं होतं. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला रोहित वेमुलाने आत्महत्या का केली हे शोधून काढण्याची जबाबदारी होती.

रोहित अनेक समस्यांनी ग्रस्त होता, नैराश्येपोटी त्यानं आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या सुसाईड नोटमधून समोर आल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.रोहित वेमुला दलित नव्हता तसेच विद्यापीठाने केलेल्या कारवाईमुळे त्याने आत्महत्या केली नाही, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.