डायरेक्टर बनण्याअगोदर ‘हा’ दिग्दर्शक करायचा स्पॉटबॉयचे काम

टीम महाराष्ट्र देशा : डायरेक्टर रोहित शेट्टीच्या संघर्षाची कहाणी खूप जणांना माहित नाही. मात्र ग्लॅमरच्या चंदेरी नगरी मध्ये लोकप्रिय ठरलेल्या प्रत्येक स्टार्सच्या मागे संघर्षाची एक भलीमोठी कहाणी लपलेली असते. अशी कहाणी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

अशीच एक कहाणी आताचे यशस्वी डायरेक्टर रोहित शेट्टीची आहे. ज्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीने स्वतः केला आहे. ‘दिलवाले’ चित्रपट बनवणारे रोहीतने एकेकाळी स्पॉट बॉयचे काम करताना काजोलचे मेकअप आणि केसांचं सेटअप सुद्धा केले आहे.

तसेच शेट्टीने अजय देवगणच्या ‘फूल और कांटे’, ‘सुहाग’, ‘प्‍यार तो होना ही था’ आणि ‘राजू चाचा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टरच्या स्वरूपात काम केले आहे. गोलमाल सारख्या सुपरहिट चित्रपटांची सिरीज देणाऱ्या शेट्टीने सांगितले कि एका जमान्यात तब्बू, काजोल सारख्या हिरोईनच्या स्पॉटबॉय चे काम करायचो.

तसेच शो मध्ये रोहितने आपल्या चित्रपट करियरच्या स्ट्रगलच्या आठवणी सांगताना सांगितले कि, १९९५ मध्ये आलेल्या अजय देवगण आणि तब्बू यांच्या ‘हकीकत’ चित्रपटासाठी शेट्टी स्पॉट बॉय होता आणि त्यावेळी तो अभिनेत्री तब्बूच्या साडींना प्रेस करण्याचे काम करायचा.

महत्वाच्या बातम्या