रोहित शेट्टीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; ‘सूर्यवंशी’चं प्रदर्शन पुन्हा ढकललं पुढे

रोहित शेट्टी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने बगत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट येत्या ३० एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहून निर्मात्यांनी पुन्हा हा चित्रपट पुढे ढकलला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं.

नुकतीच रोहित शेट्टीने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहून सूर्यवंशीचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा मोठा आणि कठीण निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी रोहित शेट्टीचं कौतुक केलं’ अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्याने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :