रोहित शर्माचे शानदार शतक

टीम महाराष्ट्र देशा : सिडनी येथे सुरु असलेल्या भारत – ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्या मध्ये रोहित शर्माने संयमी खेळी खेळत आपले 22 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या २८९ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची पडझड होताना दिसली पण रोहित शर्माने मात्र एक बाजू लावून धरून स्वतःचे शतक पूर्ण करून भारताला मजबूत स्थितीत आणण्याचा प्रयत्न चालू ठेवला.

हे शतक रोहित शर्माचे १४ वे एकदिवसीय शतक आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी’व्हिलियर्सला सर्वाधिक षटकारांचा विक्रम देखील मोडला आहे. तसेच अर्धशतकी खेळी साकारताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर दुसऱ्या विक्रमात कर्णधार विराट कोहलीचा विक्रम देखील मोडला आहे.

You might also like
Comments
Loading...