IND vs AUS : गोलंदाजांचा कर्दनकाळ रोहित शर्मा कसोटी मालिकेत खेळणार

rohit sharama

नवी दिल्ली- फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याने उपकर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यंदा युएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही मालिकांसाठी निवड झाली नव्हती. मात्र, तो कसोटी मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता असल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

स्वतः रोहितने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, त्याची दुखापत आता ठीक आहे. रोहित लवकरच कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.रोहितने आपल्या हॅमस्ट्रिंगच्या सद्यपरिस्थितीविषयी माहिती देताना सांगितले, हॅमस्ट्रिंग सध्या ठीक आहे. त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. डॉक्टर्स हॅमस्ट्रिंग मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कसोटी मालिका प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे, पूर्णपणे तंदुरूस्त होऊनच मी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

ऑस्ट्रेलियात दौऱ्यात ११ दिवसांत सहा मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. त्यामुळेच मी हे सामने न खेळण्याचा मी निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण रोहितने दिले आहेत.”मला पुनर्वसन प्रक्रियेसाठी साडेतीन आठवडय़ांचा कालावधीत हवा होता. जर मी दुखापत सावरण्यास वेळ दिला, तर कदाचित कसोटी सामने खेळू शकेन, अशी आशा होती. मी घेतलेला हा साधा निर्णय इतका जटिल का झाला, हे मलाही कळले नाही,” असे रोहितने सांगितले.