fbpx

आयसीसीच्या काही नियामांना आता गांभीऱ्याने घेण्याची गरज : रोहित शर्मा

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कप २०१९ मध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सुपर ओवरमध्ये विजय मिळवत इंग्लंडने विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंडने इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला आहे. तर न्यूझीलंडचा फायनलमधील सलग दुसरा पराभव आहे. अंतिम सामना हा दोनदा टाय झाल्यानंतर इंग्लंडने सर्वाधिक बाउन्ड्रीच्या जीवावर वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे विजयचा निकष हा पक्षपाती असल्याचा आरोप क्रिकेट वर्तुळातून आणि क्रिकेट चाहत्यांकडून होत आहे.

भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटमधील काही नियमांना गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे ट्विट रोहित्तने केली आहे. तर अनेक माजी क्रिकेटपटूंनी देखील यावर हा इंग्लंडच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दरम्यान वर्ल्डकपचा अंतिम सामना हा अतिशय रोमहर्षक होता. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित ५० षटकात 8 विकेट गमावत इंग्लंडसमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु, इंग्लंडचा संघही ५० षटकांत २४१ धावाच करु शकला त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर विश्वचषकाचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हरही खेळवावी लागली. सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली. मात्र, इंग्लंडने दोन चौकार मारलेले असल्याने इंग्लंड विश्वविजेता ठरला.