मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली होती. दुसरा सामना रोहितसाठी खास राहिला नव्हता. दुसऱ्या सामन्यात तो शून्यावरच बाद झाला होता. भारतीय संघाला या सामन्यात इंग्लंडकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. शेवटच्या निर्णय एके दिवशी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्यावेळी रोहितला सामन्यात एक खास विक्रम करण्याची संधी मिळणार आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत तो पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मागे टाकू शकतो.
रोहित त्याच्या आक्रमक आणि तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७६ धावांची खेळी खेळली ज्यात त्याच्या बॅटमधून एकूण ५ षटकार आले होते. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो आपल्या नव्या विक्रमाच्या इराद्याने मैदानात उतरेल. रोहितला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला विजय मिळवून देण्याची संधी असेल. त्याचबरोबर षटकारांच्या विश्वविक्रमाच्याही संधीचा रोहित पुरेपूर फायदा घेईल. त्याला सर्वाधिक षटकारांचे अव्वल स्थान गाठणे अवघड आहे पण तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.
वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने ५३३ आंतरराष्ट्रीय षटकार ठोकले आहेत. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकार आहेत. भारताच्या रोहित शर्माने ४७१ आंतरराष्ट्रीय षटकार ठोकले आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने ३९८ षटकार ठोकले.न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर ३७२ षटकार आहेत. एमएस धोनीने एकूण ३५९ षटकार ठोकले आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ ने बरोबरीत आहेत. या मालिकेतील तिसरा व शेवटचा निर्णायक सामना उद्या मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ मालिकेचा बाजीगर ठरेल. या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केल्याने इंग्लंडचा पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांना जखडून ठेवत इंग्लंडने सामन्यात दणदणीत विजय मिळवला होता. आता या मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Vijay Wadettiwar | “तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून…”; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
- Rakhi Sawant | “ललितजी क्या हात मारा है”; राखी सावंतची सुष्मिता आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया
- Virat kohli : “७० शतकं झळकावणाऱ्या विराट कोहलीला वगळण्याचा…”; शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- Vijay Wadettiwar | “तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून…”; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
- Chhagan Bhujbal | सरपंच जनतेतून मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का? ; छगन भुजबळ यांचा सवाल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<