ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का

blank

टीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये रोहित शर्मा खेळला नव्हता. पण तो चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितला पहिली पसंती देण्यात येईल. पण रोहितबरोबर नेमका कोणता फलंदाज सलामीला येईल, याबाबत सध्या विचार सुरु असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचआधी भारतीय टीम संकटात सापडली आहे. सरावादरम्यान रोहित शर्माच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यानंतर फिजिओकडून उपचार घेऊन रोहितने सराव सुरुच ठेवला.

रोहितच्या दुखापतीवर बीसीसीआयकडून अजून स्पष्टीकरण आलेलं नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली वनडे १४ जानेवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. ताज्या दमाने संघात परतणाऱ्या रोहितकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, भारताचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केलेला थ्रो रोहित शर्माच्या अंगठ्याला लागल्याची माहिती आहे. बीसीसीआयने रोहितच्या दुखापतीबाबत काही सांगितलं नसलं तरी फिजिओ रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत.