fbpx

नाद खुळा : दिग्गजांचे विक्रम मोडीत हिटमॅनने घडवला विश्वचषकात इतिहास

आयसीसी वर्ल्ड कप २०१९ : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारताने या सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवला.

रोहित शर्माने घडवला विश्वचषकात इतिहास

विश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती.

भारताच्या सलामीवीरांनी १८९ धावांची भागिदारी करून चांगली सुरूवात करून दिली. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रमही भारताकूडन झाला. रोहित आणि केएल राहुल यांनी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तिसरी शतकी भागिदारी केली. तर भारताकडून ही चौथी शतकी भागिदारी आहे. वर्ल्ड कपमध्ये पहिल्या विकेटसाठी एकूण चार शतकी भागिदारी करणारा भारत पहिला संघ ठरला आहे.