रोहित शर्माची शानदार फटकेबाजी, शतकासह अनेक विक्रमांना गवसणी

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. या शतकासह रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पहिल्यांदाच खेळताना दोनही डावात शतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे.

मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये ठसा उमटवलेल्या रोहित शर्माला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १७६ धावांची खेळी केली होती. तसेच त्याचा सहकारी मयंक अग्रवालने द्वीशतक झळकावले होते. या दोघांच्या खेळीने भारताने आपला पहिला डाव ५०२ धावांवर घोषित केला होता.

रोहित शर्माने दुसऱ्या डावातील खेळीत त्याने १४९ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ७ षटकारांसह १२७ धावांची खेळी केली. त्याला पुजाराने ८१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दरम्यान दोनही डावांत शतकी खेळी करणारा रोहित हा सहावा खेळाडू ठरला आहे. रोहितच्या आधी सुनील गावसकर, राहुल द्रविड, विजय हजारे, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांनी ही कामगिरी केली होती.

महत्वाच्या बातम्या