रोहित शर्माचे वनडे कारकिर्दीतील १३वे शतक

भारतीय वनडे संघाचा सलामीवीर रोहित शर्माने चौथ्या वनडे सामन्यात दणदणीत शतकी खेळी आहे.यासाठी त्याने ८६ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ३षटकार लगावले आहेत.

रोहितचे वनडे क्रिकेटमधील 13 वे शतक आहे. रोहितने दुसऱ्या वनडे सामन्यात ५४, तिसऱ्या वनडे सामन्यात नाबाद १२४ तर आज शतकी खेळी आहे. त्यापूर्वी सलग १० सामन्यात श्रीलंकेत हा फलंदाज पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. भारताकडून सर्वाधिक वनडे शतके करणारा रोहित आठवा खेळाडू बनला आहे.

सध्या भारतीय संघ 34 षटकात 2 बाद 258 अशा चांगल्या स्थितीत आहे.  रोहित शर्मा १०० तर हार्दिक पंड्या १९ धावांवर खेळत आहे.

You might also like
Comments
Loading...