दुखापतीमुळे शर्मा न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर,’या’ युवा खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा- न्यूझीलंडविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर रोहित शर्मा, दुखापतीमुळे वन-डे आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. ज्यामुळे त्याला अर्ध्यातच मैदान सोडावं लागलं होतं.

दरम्यान, भारतीय संघाने कालच पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असा विजय मिळवत इतिहास घडवला होता. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला आतापर्यंत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सर्व सामने जिंकता आले नव्हते. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा पराक्रम केला.

Loading...

भारतीय संघाने मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफीसह फोटो काढत असताना रोहित शर्माच्या डाव्या पायाला पट्टी दिसली होती.रोहित शर्मा याच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी देण्यात येणार? याची भारतीय प्रक्षेकांना उत्सुकता आहे. तर न्यूझीलंड ए विरोधात दुहेरी शतक झळकावणारा शुभमन गिल याला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

न्यूझीलंड ए विरुद्ध भारत ए संघात खेळत शुभमन गिलने मोठी कामगिरी बजावत दुहेरी शतक ठोकले होते. सध्या शुभमन गिल चांगल्या प्रदर्शन करत आहेत. यामुळे न्यूझीलंड संघाविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये, ICMRचा धक्कादायक रिपोर्ट
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी